दुरावा
सगळे वाद मिटले तरी अस का वाटावं..
वाहणार पाणी अस मध्येच का आटावं..
शब्दांतून गुंफायचो आपण शब्दांची एक साखळी..
आता निःशब्दपणे ऐकतो शांततेची पोकळी..
दिवस असायचा गोडीचा, रात्री गुणगूण तुझ्या शब्दांची..
आता सूर्य मावळतो आठवणीनी चंद्राला भीती अंधाराची..
दोन जीवांची जवळीक इतकी का कुणास खुपली..
अलगद अशा गोड नात्याला का कुणाची नजर लागली...???