एका उन्हाची कैफियत
मराठी गझलांची एक आशयघन मैफल
सादरीकरण: कवी-गझलकार चंद्रशेखर सानेकर आणि संगीतकार-गायक मिथिलेश पाटणकर.
या कार्यक्रमात फक्त चंद्रशेखर सानेकर यांनी लिहिलेल्या आणि मिथिलेश
पाटणकर यांनी स्वरबद्ध केलेल्या गझलांचे सादरीकरण होईल. सानेकरांचे
गझलवाचन आणि मिथिलेशचे गझलगायन असे कार्यक्रमाचे स्वरूप असून कार्यक्रमात
फक्त दोघेच रंगमंचावर असतात. दीड ते दोन तासांच्या कार्यक्रमाला मध्यांतर
नाही.
१७मे २००९, सहयोग मंदिर, घंटाली, ठाणे
२३मे २००९, नंदादीप विद्यालय, गोरेगाव (पूर्व)
३१मे २००९, माधवाश्रम, डोंबिवली (पूर्व)
१३जून २००९, दादर माटुंगा कल्चरल सेंटर, दादर
ह्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे.
वेळ : संध्याकाळी ७वा. (सर्व ठिकाणी)
प्रवेश विनामूल्य