वाढणं !

वाढत जावं वटवृक्षासारखं
चारही दिशांनी
जमिनीशी नातं जोडत
आणि जावं जेवढं
आकाशाच्या दिशेनं
वाढावं तेवढंच
मातीच्या आतही
म्हणजे भीती नाही उरत
उन्मळून पडण्याची !