सरला अंध:कार!

सरला अंधःकार!

आता प्रकाशमय होणार!

आता प्रकाशमय होणार!

जागोजागी जाग येता,

कमळे ही फुलणार!

आता कमळे ही फुलणार!!

सुजाणतेचा दीप तेवता,

अंधता नुरणार!

बाई ग, अंधता नुरणार!!

आरोग्याची दिशा उमगता,

अनारोग्य पळणार!

बाबा, अनारोग्य पळणार!!

हास्यरसाचे महत्त्व कळता,

चिडचिड ही सरणार!

चिडचिड ही सरणार!!

गीतांमधूनी शक्ती मिळता,

निराशा नच उरणार!

आता निराशा नच उरणार!

तेजोमयता समोर दिसता,

उत्साहच स्फुरणार!

मजला उत्साहच स्फुरणार!!

विजयपथावर  ठायी-ठायी,

होकारच खुलणार!

होऱ्हो, होकारच खुलणार!!

सरला अंधःकार,

सारे प्रकाशमय होणर!

आता प्रकाशमय होणार!!