.....................................
.... क्षितिजापाशी!
......................................
कुणीच जाऊ नये कधीही क्षितिजापाशी!
अनंत अंतर आणिक आशाही अविनाशी!
स्वप्ने पाहू नयेत फसवी अन् मायावी...
त्याचा घेऊ नये ध्यास, जे सदैव भावी...
चुकून जाऊ नये कहाणीमधील गावी...
प्रवास पुढचा खुंटवेल ही जखम जराशी!
नसलेल्याची येई का चाहूल कधीही?
नयेच मागू आकाशीचे फूल कधीही...
पडू न द्यावी भ्रम-भासांची भूल कधीही...
जवळ ज्या क्षणी दूर त्या क्षणी मृगजळराशी!!
- प्रदीप कुलकर्णी
........................................
रचनाकाल ः १३ मे २००९
........................................