मंडळ भारी आहे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नेमकं काय करतं असा प्रश्न बरयाच दिवसांचा मला पडला आहे. नुकतीच  दुवा क्र. १ बातमी वाचली. एक तर काही करू नये, करायचे असेल तर पुर्ण विचार करून ठरवावे आणि त्यावर ठाम राहावे, असं ना मंडळाचं झालय ना सरकारचं. सतत निर्णय बदल केल्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ होतो हे यांना कळेल का कधी.

आता इयत्ता १ आणि २ साठी इंग्रजीची लेखी परीक्षा नसणार. म्हणजे काय? आधी आमची पोरं (आणि मास्तर) काय दिवे लावत होते ते माहिती आहेच, त्यात आता ही एक भर. अरे एक काहीतरी करा ना.

आणि अजिबात जमत नसेल तर सगळ्या सरकारी शाळा विकून टाका कींवा वाटून घ्याव्या शिक्षण सम्राटांनी आणि हवा तो गोंधळ घालावा.

शिक्षणाचे खाजगीकरण करून शिक्षणाचा बट्ट्याबोळ केलाय अस वाटतय.