तुझा स्पर्श

माझे आसुसलेले मन

तुझ्या त्या स्पर्शाची वाट पाहत राहते

आणि जेव्हा तू आपला बहर घेउन येतोस

तेव्हा त्यातलेच होउन जाते

तुझा स्पर्श जणू एक श्रावण सर

क्षणात येऊन माझ्या अत्रुप्त मनाला

चिंब चिंब भिजवून जाते

तुझा हळूवार स्पर्श

माझ्या रोमारोमाला फुलवतो

आणि माझा मनमोर झुलू लागतो

त्या हिंदोळ्यावर झुलताना

नेहमी मी ठरवते

तुझा स्पर्श जागेपणी अनुभवायचा

पण तुझ्या त्या जादूने

मी सम्मोहित होते

आणि सगळे भान विसरते

तू जसा नकळत येतोस

तसाच मला त्या नशेत सोडून जातोस

आणि मग मी सैरभैर होते

तुला थांबवायचा खुळा प्रयत्न करू पाहते

पण तू दूर गेलेला असतोस

तूझे अस्तित्व माझ्यापाशी ठेऊन

माझ्या मनाला चाळाच लागतो मग

पुन्हा पुन्हा तुझा स्पर्श आठवायचा

आणि त्यात झुलत राहायचा

तूझे अस्तित्व माझ्या कुशीत साठवायचा

आणि चातकाप्रमाणे

तुझी पुन्हा वाट पाहत राहायचा