आनंद दायी ?

आई फक्त आई
चालता बोलता देव!
स्पर्श करता येणारा
आनंद दायी देव!
              तुमच्यासाठी जगणारा
              अस्तित्व तुमच्यात बघणारा
              हास्यात तुमच्या हसणारा
              आनंद दायी देव!
ओल्यात स्वतः निजून
कोरड्यात तुम्हाला झोपवणारा
अर्धपोटी राहून काऊचे घास भरवणारा
आनंद दायी देव!