माझं मन

माझं मन तुझ्या आठवणींनी किती जळतंय

हे फक्त माझं मलाच कळतंय.

अगं खेळलीसच का खेळ तो प्रीतीचा

जर नव्हता माझा मोडलेला डाव सावरायचा

तु दिलेल्या जखमा विव्हळ मला करतात

तु केलेल्या विश्वासघाताची जाणीव करून देतात

आसक्ती धरली होती मीच तुझ्या सहवासाची

पण कुणास ठाऊक होतं?

अशी चलबीचल होईल तुझ्या मनाची

तुच उठवलंस वादळ माझ्या शांत जीवनी

अन निष्टुरपणे तुडवून देखील गेलीस माझ्या

भावनांना तुझ्या पायांनी

घेतल्यासच का त्या शपथा सोबत जगण्या-मरण्याच्या

अन अचानक अशा कोणत्या विचारांनी बदलल्या

तुझ्या नजरा माझ्याकडे बघण्याच्या

प्रेम काय असतं? हे मला कळतंय

कारण अगं तुझ्या या प्रेमात फक्त माझंच हृदय जळतंयअ