दृष्टी

दगडाचा देव घडविण्याची किमया मानवात कोणी दिली असेल बरे ?  पण ज्याने कोणी हि किमया प्रथम साधली असेल तो काय माणूस असेल नाही?. किती सुंदर सुंदर गुण दिले विधात्याने. सर्व काही मुक्त हस्ते वाटले .  देणाऱ्याचे हात हजार फक्त आपली झोळी फाटकी नको.
तो हजार हातांनी देतो आपण ते घ्यायलाच हवे. अथांग सागर दिला, सोनेरी पहाट दिली, जगण्यासाठी आशा दिल्ली. निरागस लहान मुलाच हसू दिलं काय द्यायचं शेष ठेवलं त्याने. सुंदर जग आहे हे तरी कश्याच्या शोधात फिरतोय आपण?
         आयुष्य हातावर घेऊन हिंडणारे जगाकडे सुंदरतेने पाहतच नसतील का?. की ह्या सुंदरतेकडे पाहायला वेळच नसेल! एका लहान बालकाच्या
नजरेतून हे जग किती निरागस आणि निष्पाप वाटत असेल , तेच षोडश वर्षीयास गुलाबी भासत असेल नाही. काय मजा आहे ह्या दृष्टीची
ति जशी असेल तसे जग दिसेल. भिकाऱ्याला सगळेच भिकारी दिसत असतील. ह्या करता सौंदर्य जगात नाही तर ते दृष्टीतच आहे हेच योग्य