गाजराची भाजी

  • पाव किलो गाजरे, २ कांदे , २ टे.स्पून मुगाची डाळ,
  • ४-५ हिरव्या मिरच्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक लिंबाचा रस, मीठ, फोडणीचे साहित्य, तेल
१५ मिनिटे
२-३ जणांसाठी

मुगाची डाळ २ तास पाण्यात भिजत घालावी व मग निथळून घ्यावी. गाजराचे छोटे छोटे तुकडे करावेत. कांदे उभे चिरून घ्यावेत. फोडणी करून त्यावर कांदा, उभ्या चिरलेल्या मिरच्या परतून घ्याव्यात. कांदा बदामी रंगाचा झाला कि गाजराचे तुकडे व मुगाची डाळ घालावी. थोडे पाणी घालून एक वाफ आणावी. गाजरे शिजली कि मग मीठ, लिंबाचा रस व कोथिंबीर घालून उतरावे

नाहीत