बटाट्याची दह्यातली भाजी

  • ५-६ बटाटे, ४-५ हिरव्या मिरच्या, १ लहानसा आल्याचा तुकडा,
  • १ वाटी चिरलेली कोथिंबीर, मीठ, १ वाटी दही, अर्धा चमचा जिरेपूड, तूप आणि तेल.
  • फोडणीसाठी : १ तमालपत्र, २ लवंगा, १ दालचिनी तुकडा, पाव चमचा जिरे व हळद.
३० मिनिटे
२-३ जणांसाठी

बटाट्याची साले काढून स्वच्छ धुवावेत व जरा मोठ्या फोडी कराव्यात आणि सुरीने अथवा काटा चमच्याने टोचून घ्याव्यात. नंतर या फोडी तेलात  तळून घ्याव्यात. दही घुसळून घ्यावे. त्यात  एक कप पाणी घालावे. मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, आले, जिरेपूड वाटून घ्यावे. तूपाची वर दिलेले फोडणीचे साहित्य घालून फोडणी करावी. त्यावर तळलेले बटाटे घालावेत. जरा परतून मग दही, वाटलेला मसाला, मीठ घालावे. जर वेळ उकळले की उतरावे. वरून कोथिंबीर भुरभुरावी.

नाहीत