रसगुल्ला कुर्मा

  • १२-१५ रसगुल्ले, ८-१० छोटे बटाटे ( मद्रासी बटाटे) १०० ग्रॅम खवा, अर्धा कप दही ( घुसळून घेतलेले), १ टे. स्पून तूप,
  • थोडे बेदाणे व काजू, १ टी. स्पून लवंग+दालचिनी+वेलदोडे पूड, मीठ, तेल.
  • वाटण्यासाठी मसाला : ४ लाल मिरच्या, १ इंच आले, अर्धा चमचा खसखस, थोडी कोथिंबीर
२० मिनिटे
२-३ जणांसाठी

रसगुल्ले अर्धा तास पाण्यात घालून ठेवून मग पिळून घ्यावेत. खवा तूपावर परतून घ्यावा. बटाटे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

मसाला वाटून तेलावर परतून घ्यावा. आता त्यात दही, मीठ, व थोडे पाणी घालावे. एक उकळी आली की काजू, बेदाणे, खवा व रसगुल्ले घालावेत. लवंग+दालचिनी+वेलदोडे पूड घालून मिनिटभराने उतरावे.

टीप नाही.