सकाळचा पहिला चहा

ओठांनी वेलची लावावी तसे तुझे ओठ
भेटावेत ओठांना
मग ती उकलावी
हलकेच जिभेने साखर पेरत...
माझ्या बाहुपाशात तुझ्या सावळ्या दालचिनीची भुकटी व्हावी
मग मी राहावे पडून निपचित बराच वेळ
तुझ्या वक्षस्थळांवर माझे शहाणे डोके ठेवून
अगदी तुझ्या बाळासारखे....