तळपत्या नभिच्या त्या सूर्याला
बनविला थंड मातीचा गोळा
आकाश ते कवेत होते ज्याच्या
छाया ती नशिबी आली त्याया
पोर्णिमेच्या चंद्र असता
काजळली का ती तुझी प्रभा
चंद्र न दिसे आता कोणी
तारे ते तरी तू सावर नभा
दिसे न चंद्र आता कोठे
भकास रितेपण ते काळे नभी
उमाळे आठवणीचे तेच ते आता
राहो ति सुखी दाता