गुपित

एका लाटेनं पुढच्या लाटेला
एक गुपित सांगितलं -
अन
खळकन फुटूनच गेली !

तेच केलं मग पुढच्या लाटेनं
अन त्या पुढच्या -
अन त्याही पुढच्या -

अन एक लाट आली मझ्यापाशी
खळकन फुटलीही!!

पण गुपित काही सांगितलंच नाही - !

की सांगितलं, पण मला समजलं नाही ?

की तिलाच समजलं नव्हतं ?

की तिच्या आधिचीला ?

की तिच्याही आधिचीला ?

- पराग जोगळेकर