फुले

घेऊन परडी फुलांची
सावरत तो इवलासा
परकर एका हाते
आली ती देवघरा
परडीत त्या फुलाच्या
तिच्याच सारखी ती फुले
गंध शण दोन शणांचा
वाहाव्यास ते सजलेले
बकुळेची फुले त्यात
त्यात फुले केवड्याची
चाफा होता त्यात
फुले दोन प्राजक्ताची
वाहिले मी फुले सर्व
ठेवून प्राजक्ताची उणे
रिक्त झाली परडी ती
प्राजक्त माझे गेली कुठे
वाहिले मी सर्व पुष्प
उरले न त्या परडीत काही
देऊन सुगंध जिवनाचा
मोकळे अंगणं केले माझे
भाव जर मनातला तुझ्या
उमगला असता माझे मनी
अव्हेरता प्राजक्ताची फुले
जिवनपुष्प वाह..तो चरणी