भविष्याच्या वाटेवर

राहिले गर्तेत अंधाराच्या,उणे पुरे आयुष्य माझे
भविष्याच्या आशेवरती, कर्मात माझ्या भरडलो मी
          भविष्य घडविण्या माझे
          वर्तमानाशी झगडलो मी
          पाहत भूतकाळ माझा
राहिले गर्तेत अंधाराच्या,उणे पुरे आयुष्य माझे
भविष्याच्या आशेवरती, कर्मात माझ्या भरडलो मी   
          घेतला कधी न विसावा
          घडविण्या भविष्य माझे
          धाव धाव धावत असता
          विसाव्या साठी अडलो मी
राहिले गर्तेत अंधाराच्या,उणे पुरे आयुष्य माझे
भविष्याच्या आशेवरती, कर्मात माझ्या भरडलो मी
         घेतला घास बांधून मुखाचा
         तोही सांडून दिधला जगी
         कमरेस जो बंध माझ्या
         तो हि काढून दिला मी
राहिले गर्तेत अंधाराच्या,उणे पुरे आयुष्य माझे
भविष्याच्या आशेवरती, कर्मात माझ्या भरडलो मी
         उणे पुरे आयुष्य माझे
         भाकरी साठीच झगडलो मी
        घेतला अखेरचा सोडून ग्रास
        विसावाच होऊन पडलो मी