निर्माल्य

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-

    -ती होता होता बायाको ओरडते

    -मध्यरात्री कुत्री ओरडते

    -पहाटे पहाटे कोकिळा ओरडते

    -आणि उजाडता उजाडता दूधवाला ओरडतो...

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-

    -ती होता होता कविता आठवते

    -मध्यरात्री प्रियसी आठवते

    -पहाटे पहाटे अंथरुण ओली करणारी धाकटी आठवते

    -आणि उजाडता उजाडता काल विसरलेली औषधाची गोळी आठवते...

                                                 संदिप खरे.....

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-

    -ती होता होता मद्यात असते

    -मध्यरात्री गद्यात असते

    -पहाटे पहाटे पद्यात असते

    -आणि उजाडता उजाडता पुन्हा एकदा 'सध्यात' असते...

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-

    -ती होता होता कळी असते

    -मध्यरात्री फुलण्याची इच्छा असते

    -पहाटे पहाटे कळीचं फूल असते

    -आणि उजाडता उजाडता फक्त निर्माल्य असते...