सख्खे शेजारी

माझ्यातली दोन मनं
अगदी सख्खे शेजारी
एक वेडं, तर एक शहाणं!

वेड्याच्या हाती तलवार
तर शहाण्याच्या ढाल!

वेडं वाट चुकत असतं
नको तिथं धावत सुटतं
शहाणं वाट शोधून काढतं
योग्य जागी नेऊन सोडतं!

वेडं सतत घाईतच असतं
संयमाशी पटतच नसतं
शहणं मात्र शांत असतं
धीराचं फळ त्याला हवं असतं!

वेडं मन हट्टाला पेटतं
धगधगत्या श्वासांनी काळीज पेटवतं
शहाणं त्याला जवळ घेतं
समजुतीच ओलाव्याने त्याला शांत करतं!