वरदाचं पावसास पत्र

पाऊसधारा, पत्र घ्या!

पूज्य वरुणराजास,
सप्रेम नमस्कार.
तुझ्या पाऊसधारा आहेत तरी कुठे?  तू तर २६ मे लाच येणार होतास.  तुझी नेहमीची तारीख आहे ७ जून.  पण तेव्हाही तू आलाच नाहीस. तू काय केरळातच अडकून बसला आहेस की काय? अरे, इथे शेतकरी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेत. आणि मुंबई , ठाण्यात तर २०-२०% पाणीकपातही सुरू आहे.  

आम्ही म्हणतो,        

॥घनघनमाला नभी दाटल्या , कोसळती धारा।
केकारव करी मोर काननी उभवुनि उंच पिसारा॥

पण , तुझ्या पाऊसधारा आल्याच नाहीत,तर मोर नाचतील कसे ? केकारव करतील कसे? तुझ्यावरच आमचं सर्व जीवन अवलंबून आहे!

बरं, आता निरोप घेते! तुझा पत्ता काय? हां! आठवला तुझा पत्ता!

पत्ता-१२३४५६७८९१०, स्वर्ग निवास, इंद्र्नगर, अंबरवाडी, नंदनवनासमोर, गगनगाव.

दूरध्वनी-१२३४५६७८९१०१२३४५६७८९१०

तुझ्या प्रतीक्षेत,
वरदा