काही क्षण

असेही काही क्षण आयुष्यात असतात
मनाच्या आकाशात लुकलुकत असतात

अवखळ क्षण, खळखळाट भरलेले
मनाला भिडलेला चंचलपणा
मौज-मस्तीचा उधाण वारा
दिशाहीन कुठेही वाहणारा

श्वास रोखणारे सुखही असते
गुदमरून, हृदयी कोंडलेले
भार पेलवत नाही सुखाचा
म्हणून नयन कडांतून ओसंडलेले.

क्षण असतात सुख-दु:ख एकोप्याचे
दु:खातून सुख शोधण्याचे
सुखातील दु:ख जाणण्याचे
सुख-दु:ख आनंदण्याचे.