भ्रष्टाचार

बोफोर्सचा बट्ट्याबोळ झाला।
शेअर्स घोटाळा आता संपला।
हवाला हवा खात जाईल।
भ्रष्टाचार मात्र सदोदित राहील।

मुंद्राक घोटाळा अजून नाही कळला।
अनेक राज्यात त्याचा खटला चालला।
तेलगी मुक्यानेच मरून जाईल।
भ्रष्टाचार मात्र सदोदित राहील।

चौकशीसाठी, एक कमिशन नेमले जाते।
सत्तांतरांनंतर दुसरे येते।
कामकाज असे ठप्प होत जाईल।
भ्रष्टाचार मात्र सदोदित राहील।

नैतिकता शिकवून येत नाही।
आचरण त्याचे होत नाही।
 काळ असाच पुढे जात राहील।
भ्रष्टाचार मात्र सदोदित राहील

- अनंत खोंडे.