धातुपारायण

संस्कृतमधील विविध धातु आणि त्यांची रुपे ह्यांचे सार्वजनिक पारायण मुंबईतील एक अभ्यासकांचा गट नियमित करतो. सर्व संस्कृत प्रेमींना ह्यात सहभागी होता येईल.

हा अभ्यास म्हणजे नुसते पाठांतर नसून विविध सूत्रांच्या आधाराने निर्मिलेली स्मरणशक्तीची अद्भूत किमया असते. तरी सर्व संस्कृत अभ्यासकांना आणि पिपठिषूंना वि. वि. की त्यांनी दि. ११ व दि. १२ जुलै २००९ रोजी विलेपार्ले मंदीराच्या आवारात होणार्‍या धातुपारायणाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. वेळ : स. ९ ते १२ आणि सायं. २ ते ५.

आपला,
डॉ. मल्हार कुळकर्णी