मला जी भेटली ती फसवी असावी
का उगीचच भाळलो त्या मुग्धतेला
फुकटचच कुरवाळत बसलो स्वप्नाला
देव जाणो तिही माझी नसावी
तिचे ते सलज्ज लाजून बघणे
कारणा वीणा माझे ते घोटाळणे
अवस्थेवर माझ्या त्या हळूच हसणे
ती हसरी छबी अशी का फसवी असावी
झाले काय ते कळे ना मला मुळी
फसवे जगणे भाळले ना जनी
सोडून जि ह्या फसव्या जगात गेली
कदाचित ती तिची प्रतिकृती असावी