दुधी भोपळ्याचे रायते

  • १ पाव दूधी भोपळा
  • घुसळलेले आंबट-गोड दही-१/२ वाटी
  • मोहरीची डाळ - १ चमचा
  • फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, तिखट
  • मीठ, साखर चवीप्रमाणे
१० मिनिटे
२ जणांसाठी

दूधी भोपळ्याच्या बारीक फोडी करून त्या उकळून घ्याव्यात. त्यातले पाणी पूर्णपणे निथळून घ्यावे. त्यानंतर त्यात घुसळलेले आंबट-गोड दही घालावे. मोहरीची डाळ घालवी. फोडणी करून त्यात घालावी. मीठ व साखर चवीप्रमाणे घालावे. सर्व नीट एकत्र करावे.

भोपळ्याच्या फोडी उकळताना त्याचा लगदा होणार नाही याची काळजी घ्यावी.

आई