दह्यातला पालक

  • पालकाची ताजी पाने स्वच्छ धुवून चिरून २ वाट्या
  • फेटलेले ताजे दही एक ते दीड वाटी
  • पुदिन्याची पाने १०-१२ बारीक चिरून
  • मिरपूड चवीनुसार
  • मीठ / सैंधव चवीनुसार
१० मिनिटे
२ जणांसाठी

पालकाची पाने चांगली १०-१५ मिनिटे मीठाच्या पाण्यात धुवून बारीक चिरून घ्यावीत. ज्यांना कच्चा पालक खायला आवडतो त्यांनी कच्चीच ठेवावीत, नाहीतर उकळत्या पाण्यात ५ मिनिटे ठेवून त्यांना वापरावे. दही फेटून त्यात मीठ, मिरपूड व पुदिना घालून पुन्हा फेटावे. सैंधव वापरल्यास अजून छान! त्यात पालकाची चिरलेली पाने घालून व्यवस्थित एकजीव करावे. आवश्यकतेनुसार गार करावे व वाढावे.

काहीजण दह्यातल्या पालकाला तूप, जिऱ्याची फोडणीही देतात. काहीजण मिरपूड ऐवजी हिरव्या मिरच्या वापरतात. परंतु सर्वच पदार्थ हिरवे असल्याने अनेकदा मिरची दाताखाली येते, म्हणून त्याऐवजी मिरपूड.

आई