झटपट लसूण-शेंगदाणा चटणी ..

  • शेंगादाणे -> अर्धी वाटी
  • लाल सुक्या मिरच्या -> ४-५ (तिखट अजून हवी असल्यास अजून)
  • लसूण पाकळ्या सोलून -> अर्धी वाटीभर
  • मीठ -> चवीनुसार
  • साखर -> आवड व चवीनुसार
  • गोडेतेल -> पाव वाटी
१० मिनिटे
जितकी आवडत असेल तितकी वाढवावी लागेल

वरील सर्व साहित्य मिक्सरमधून जाड- भरडसर काढावे.
पाव वाटी गोडेतेल गरम करून मिश्रणावर घालावे व चांगले हलवून डब्यात/बरणीत भरावे.
झणझणीत चटणी तयार.

सदैव तीच ती पोळी भाजी खाऊन जाम कंटाळा येतो कधीतरी, मग अशी मस्त तिखट चटणी करायची, जेवणाला एकदम चव येते.. सोबत गरमागरम भाकरी आणि त्यावर घरच्या पांढऱ्या  लोण्याचा गोळा ठेवल्यास उत्तम.

सौ. अनिता राजगुरू