अनोखं नात

मिटलेल्या पानातील मोरपीसाचे
नाते त्यांशी असे जडले
सुख:दुखाचे सारे धागे
क्षणाक्षणांत जुळू लागले

प्रत्तेक शब्द मोरपीसाशी
आपलेपणाने बोलू लागला
आपले ओले कोरडे क्षण
त्या संगे वाटू लागला

मोरपीस मग सारे क्षण
अनुदीत अनुभवू लागला
बंद पानांतील शब्दासंगे
आयुषाचे क्षण जगु लागला

एक दिवस ते मोरपीस
पानांमधुन ढळले
मोरपीसाच्या विरहात मग
ते शब्द सुद्धा भिजले