इच्छा मनी नसतेच मुळी
जगण्यातली म्हणे त्याला
इच्छे शिवाय जगणे असे
कसे काय जमते त्याला
पाहिला येथे दिवस भुकेला
ऊगवत्या क्षणी आसुसलेला
आग नजरेची पोटामधुनी
विझवणे कसे जमते त्याला
इच्छा भारी असते सारी
झोळी का त्याची फाटकी
आशे विण जगणे त्याचे
मोक्षाची तर असुया भारी