शब्दांचं गावं

शब्दांना शोधतीय मी... माझ्या ...कदाचित काल तुझ्याकडेच राहिले असतील

आजकाल मी खुपशा गोष्टी अशाच  विसरते मग पडते बाहेर .... तुझ्या शोधात

तू  जादूगार आहेस... शब्दांचा... नेमके मला हवे तेच शब्द स्वत:च्या पोतडीतून बाहेर काढणारा

माझेच शब्द मीच ऐकते पण ते बोलणारा तू असतोस

माझे डोळे शोधत राहतात तुझ्यामधल्या मला...

पणं तूही केवळ तू नसावास.....

तुला सापडलेले शब्दांचे गावं मला सांगशील?