स्थान : कबर ( दोन कबरी - शेजारी शेजारी ) - पात्रेः एक पंचाव्वन वर्षाचा माणूस अन एक वीस वर्षाचा
पंचावन्नचे अक्षर 'प' अन वीसचे 'वी'
प - तू कसा काय आलास इतक्यात?
वी - मारले साल्यानी
प - का रे?
वी - अगदी साधे कारण! मी प्रेम केले.
प - आमच्यावेळी नव्हते असे!
वी - तुमच्यावेळी कसे असेल? सगळेच बुरखे! आता कसे? स्कर्ट, मिडी, फ्रॉक अन... जाउदे राव?
प - अन काय?
वी - अन ते हे... आपले...
प - लो वेस्ट जीन्स का?
वी - च्यायला? तुम्हाला कसे माहीत हो?
प - मी शरीराने म्हातारा झालो होतो.
वी - तुम्ही का आलात?
प - मनाने तरूण असल्यामुळे.
वी - का?
प - शेजारची काय होती रे? नुसता...
वी - नुसता काय?
प - नुसता जाळ!
वी - जाळ? माझी पण जाळच होती!
प - ऍक्चुअली माझी तर जाळ होतीच.
वी - तुमची जाळ होती? आपले... होता? मग झाले काय?
प - एकदा तिच्या नवऱ्याने तिला वाईट मारले.
वी - का?
प - ती माझ्याकडे ते हे झाली
वी - ते हे म्हणजे?
प - ऍट्रॅक्टेड का काय ते...
वी - हां हां
प - मग हाणले तिला नवऱ्याने
वी - मग?
प - मग काय? माझ्या बायकोला समजले. तिने वीष घातले माझ्या जेवणात.
वी - हो? पण तुमच्या वृद्ध बायकोला... म्हणजे ... माफ करा ह?
प - अरे गेली खड्ड्यात!
वी - त्या वृद्ध स्त्रीला प्रॉब्लेम असायचे कारणच काय?
प - कुठल्या वृद्ध स्त्रीला?
वी - तुमच्या पत्नीला?
प - ती कसली वृद्ध? लाइनी मारायची ती
वी - काय सांगता काय?
प - म्हणजे? मी काय उगाच भलतीकडे बघेन काय?
वी - ती... आपले ... त्या कुणावर ला... म्हणजे त्यांना कोण आवडायचे?
प - तिला त्या जाळाचा नवरा आवडायचा
वी - ई
प - ई काय? आवडायचा...!
वी - पण इतका तरूण माणूस आवडणे म्हणजे...
प - ती तरुणच होती
वी - कशी.. कशा काय?
प - ती माझी आठवी बायको होती.
वी - ओ हो
प - पण तुला कुणी मारले?
वी - बायकोच्या मित्राने
प - का?
वी - तिला तो आवडत असावा.
प - कशावरून?
वी - सारखी गॅलरीत जायची. कुंड्यांना पाणी घालायला.
प - मग?
वी - मी विचारले
प - काय?
वी - की तू ही अशी ...
प - अशी म्हणजे?
वी - अशी म्हणजे ही अशी...
प - अरे नीट बोल की? कबरीत गेल्यावर काय लपवायचे?
वी - ही अशी गुलाबी टॉप..
प - व्वा!
वी - व्वा काय?
प - गुलाबी टॉप मला फार आवडतो.
वी - कबरीत गेल्यावर कसल्या आवडी निवडी?
प - पुढे?
वी - अन ही जीन्स...
प - ही जीन्स म्हणजे?
वी - ती जीन्स कुठेही जायची हो?
प - आईशप्पथ...
वी - अहो... हे माझ्या पत्नीचे चालले आहे.
प - हां हां ... बोल...
वी - हा गुलाबी टॉप अन ही जीन्स घालून तू सारखी टेरेसमध्ये का जातेस असे मी विचारले.
प - काय सांगतोस?
वी - का?
प - पुढे सांग?
वी - तर ती लाजली
प - ते ठीक आहे... लाजणारच, पण पुढे काय झाले?
वी - काही नाही... डायरेक्ट मला मारायला तो शेजारचाच आला. लई धुतला राव? मुक्या माराने मेलो मी!
प - साल्या तू होय तो?
वी - म्हणजे?
प - मीच धुतला तुला. ते कळल्यावर माझ्या बायकोने मला वीष घातले.
वी - अरे तिच्यायला... तू होय तो? उठ... उठ लेका?
प - कशाला?
वी - आता बेकार मारणार आहे मी तुला...
प - अरे पड निवांत... मी काय अन तू काय ? कोणीच नाही उठू शकत!
वी - तुझी बायको लेका काय होती राव?
प - ती आहे अजून... तूच नाहीयेस
वी - तू तरी कुठे आहेस? मेला वीष पिउन! हा हा हा !
प - लेका आठवे लग्न होते. मजाक आहे काय?
(वाद समाप्त)