तिला भेटिस बोलावले तेंव्हा
मनात एकच अनामिक हुरहुर
ती येणार ?
ती नाही येणार ?
शंका आणि आशा दोघेही
तेव्हड्यात कसलासा आवाज
क्षणभर ह्रुदयाचा ठोका चुकलेला
नजर चहुऔर
तीला शोधत
पण,
पण छे....
निव्वळ केवळ भास
पुन्हा मनात तगमग
आणि तोच एकांत
आता हळू हळू
सांजराणी उतरायला लागली
आणि दिवसभराची धगधग
गारव्याच्या कुशीत
निजायला लागली
आणी अचानक
कुठून दरवडला
एक मंद धुंद सुगंध
मन थोडे सावध
थोडे त्यातच हरवलेले
मागे वळून बघताच
होती समोर ती
तारुण्याने नटलेली
सौंदर्याने भरलेली
शांत मंद स्मित करत
फ़क्त व्यक्त करत होते
तिचे डोळे
मिलनासाठी आतुर
एका प्रियतमेच्या भावना...............