कॉर्न बटाटा

  • बटाटे उकडलेले - ३/४ मोठे
  • स्वीट कोर्न दाणे उकडलेले - साधारण १.५ वाटी
  • आले, लसूण, मिरची,पुदिना पेस्ट-२ चमचे
  • कोथिंबीर- १/२ वाटी
  • ब्रेडचे स्लाईस-३/४
  • मीठ-चवेनुसार
  • साखर - चवीनुसार
२० मिनिटे
३/४ जणाना पुरेसा

प्रथम उकडलेले बटाटे स्मश करून त्यात ब्रेडचे स्लाईस कडा काढून घालावेत. थोडी कोथिंबीर घालावी, चवीनुसार मीठ घालावे व सर्व मिश्रण व्यवस्थीत मिसळून घ्यावे. खूप चिकट वाटल्यास एक ब्रेडचा स्लाइस मिसळावा.

उकडलेल्या स्वीट कोर्नमध्ये आल, लसूण, मिरची, पुदिना पेस्ट घालावी. चवीनुसार मीठ घालावे. स्वीट कोर्न मुळातच गोडसर असल्याने साखर कमी घालावी. सर्व नीट एकत्र करावे. आवडत असल्यास थोडा चाट मसाला व आमचूर पावडर घालावी. त्याने एक वेगळी चटपटीत चव येते.

आता बटाट्याच्या मिश्रणाचा लिंबाएव्हडा गोळा घ्यावा. त्याला मधून खोलगट आकार देवून त्यात स्वीट कोर्नचे सारण एक मोठा चमचा भरावे. बटाट्याची पारी सर्व बाजूने नीट बंद करून पटिस तयार करून घ्यावे. एकावेळी दोन असे तेलात तळून घ्यावे. चिंचेच्या चटणीबरोबर किम्वा टोमटो सौस बरोबर गरम गरम द्यावे.

लहान मुलाना देताना आपली साधी पोळी तव्यावर साधारण गरम करून घ्यावी. त्यावर चाट मसाला भुरभुरावा. त्यावर एक पटिस फोडून घालावे. वरून बारीक चिरलेला कांदा, किसलेले गाजर, कोबी पसरून पोळीचा रोल करून द्यावा. मुले आवडीने खातात.

ह्या पटिसबरोबर टोमटो सूप आणि मुगाच्या डाळीची खिचडी केली कि पावसाळ्यातील सुंदर मेनू तयार होतो.


नाही