मिश्र भाज्यांचे थालीपीठ

  • कणीक २ १/२ वाट्या
  • डाळीचे पीठ १ वाटी
  • १ गाजर(मध्यम आकाराचे) - किसून
  • १ काकडी - किसून
  • पत्ता कोबी, दूधी भोपळा - किसून (अर्धी वाटी)
  • मेथी/पालक - बारिक चिरून (अर्धी वाटी)
  • १ कांदा - बारिक चिरून
  • २ हिरव्या मिरच्या - चिरून
  • कोथिंबीर - बारिक चिरून
  • १ लहान उकडलेला बटाटा - किसून
  • हळद, तिखट, जीरे पावडर, ओवा, मीठ चवीप्रमाणे
  • तेल
१५ मिनिटे
२ जणांसाठी

सर्व भाज्या धुवाव्यात व चिरून/किसून  घ्याव्यात. एका भांड्यात सर्व भाज्या,कणीक व डाळीचे पीठ एकत्र करावे. त्यात हळद, तिखट, जीरे पावडर, ओवा, मीठ चवीप्रमाणे टाकावे. आवश्यकते प्रमाणे पाणी घालावे व सर्व एकत्र करावे.

तवा गरम करावा. पीठाचा लहान गोळा घेउन तव्यावर थालीपीठ थापावे. सर्व बाजूने तेल सोडावे. खमंग भाजावे.

दही/ लोणी व  लोणच्यासोबत गरम गरम खावे!

आवडीप्रमाणे व आवश्यकतेप्रमाणे पीठाचे प्रमाण कमी-जास्त करावे.

घरी ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्याप्रमाणे वापराव्यात.

स्व-प्रयोग