हिरवे सलाड

  • मेथी - बारीक चिरून - १/२ वाटी
  • पालक - बारीक चिरून- १ वाटी
  • कांद्याची पात - बारीक चिरून- १ वाटी
  • कैरी - १ लहान
  • पुदीना - १/४ वाटी- चिरलेला
  • मीठ, जीरे पावडर, तिखट चवीप्रमाणे
१० मिनिटे
४ जणांसठी

मेथी, पालक, कांद्याची पात,पुदीना (बारीक चिरलेले) एका भांड्यात एकत्र करावे. कैरीच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. आवडीप्रमणे कैरी सलाडमध्ये टाकावी. जास्त आंबट होणार नाही याची काळजी घ्यावी. मीठ, जीरे पावडर, तिखट चवीप्रमाणे घालावे. हिरवे सलाड तयार!

कैरी उपलब्ध नसल्यास लिंबू पिळले तरी चालते. आवडत असल्यास चवीला साखर टाकावी.