सूं सूं सूं सूं सुटला वारा
गड गड गड गड आवाज आला
फड फड फड फड उडाली काऊ
चल चल चल चल नाचू गाऊ
या रे या या रे या लवकर सारे फेर धरा
टप टप टप टप येइल पाऊस
गारा पडता घालू धुडगुस
झुळू झुळू झुळू झुळू वाहिल पाणी
तयार ठेवू नावा बोटी
आईला पण सांगू नका
नन्नाचा पाढा ऐकू नका ॥