वाटली डाळ

  • २ वाट्या हरबरा डाळ
  • ४, ५ हिरव्या मिरच्या
  • १ मध्यम कांदा, १ मध्यम टोमॅटो
  • चवीनुसार मीठ, १ चहाचा चमचा साखर
  • तेल
  • फोडणीचे साहित्य
  • ओले खोबरे, कोथिंबिर, लिंबू
१ तास
४ ते ५ बशा भरून

कांदा व टोमॅटो चौकोनी चिरावेत.
साधारण पळीभर तेलात फोडणी करावी त्यात कांदा व टोमॅटो घालून एक/दोन वाफा आणाव्या, (पोह्यांकरता कांदा घालतो तसे. ) नंतर त्यात भरड वाटलेली डाळ घालावी व नीट मिक्स करून झाकावे व एक वाफ येऊ द्यावी. नंतर त्यात मीठ व साखर घालून ढवळावे व परत झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. नंतर त्यात थोडे ओले खोबरे आणि कोथिंबिर घालावी व अजून एक वाफ आणावी.
सर्व्ह करताना थोडा लिंबाचा रस घालावा आणि खोबरे, कोथिंबिरीने सजवावे.

वरील साहित्यात ४ ते ५ बशा भरून वाटली डाळ होईल.

स्वतः