मंगलोरी पद्धतीचे पालक रायते (पालक तांबली)

  • पालक चिरलेला १ कप
  • घट्ट दही १ कप
  • अर्धा चमचा जिरे
  • ४ काळ्या मिरीचे दाणे
  • हिरव्या मिरच्या २ बारीक चिरून
  • अर्धा टीस्पून मोहरी
  • ५-६ कढीपत्त्याची पाने
  • तूप/ तेल
  • मीठ
१५ मिनिटे
३ ते ४ माणसांसाठी

चमचाभर तेल तापवून त्यात जिरे, मिरी दाणे, मिरच्या, चिरलेला पालक, मीठ घालून पाच-सात मिनिटे परता. हे मिश्रण थंड झाले की मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट काढून घ्या. त्यात दही व थोडे पाणी मिसळा. मिश्रण सरसरीत झाले पाहिजे. आता चमचाभर तूप गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता घालून ही फोडणी तयार रायत्यावर घाला. पोळी, ब्रेड, भाताबरोबर बाजूला तोंडीलावणे म्हणून ही अतिशय सोपी कृती आहे.

ही तांबली फ्रीजमध्ये ठेवून गार केल्यास मस्तच लागते. अवश्य करून पहा!