मँगो लस्सी

  • गोड दही (फॅट फ्री असेल तर कॅलरी कॉन्शस लोकाना बरेच ) - १ वाटी
  • हापूस आंब्याचा रस (पल्प वापरायलाही हरकत नाही मी पल्पच वापरला आहे) - पाऊण वाटी
  • साखर - चवी/गोडी प्रमाणे
  • बर्फाचे चौकोनी तुकडे - २-३ (जितके गार हवे असेल तितके )
  • दूध - लस्सी दाट झाल्यास पातळ करावयास (ऐच्छिक )
५ मिनिटे
एक मोठा ग्लास भरून

पल्प वापरल्यास सर्व जिन्नस एग बीटर /रवी ने घुसळा किंवा सरळ मिक्सर मधून काढा. बर्फासकट म्हणजे एकदम दाट लस्सी तयार होईल गारेगार..

आंब्याचे तुकडे वापरत असाल तर आधी ते नीट कुस्करून घ्या आणि आमरसात धागे / शिरा नाहीत याची खात्री करा, हापूस आंबा असेल तर त्यात धागे /शिरा नसतातच. आणि मग वरील सर्व जिन्नस घालून एकत्र घुसळून घ्या. बर्फ घाला आणि ग्लासात ओतून गारेगार आस्वाद घ्या..

काही लोक रवीने घुसळणेच जास्त पसंत करतात कारण तसे केल्याने लस्सीत दह्याचे कण कण येतात ते काही लोकाना आवडतात. मिक्सर मधून काढल्यास एकदम तलम / प्लेन लस्सी होते.

स्वप्रयोग