आसवांचा असू दे नाहीतर मेघांचा
तुला सदैव कोरडा ठेवेल ती छत्री
अशी होती तुझी आणि माझी मैत्री
तुझ्यासोबत आनंद व्हायचा द्विगुणीत
दु:खही हलके होइल याची खात्री
अशी होती तुझी आणि माझी मैत्री
सोबत तू; फिकीर न माझ्या गात्री
बोलाव तू; धावत येइन अवेळी रात्री
अशी होती तुझी आणि माझी मैत्री
.....,
आता मात्र जग बदलले मित्रा
जुने झालेत 'शोले' आणि 'दोस्ती'
सध्या आहे 'दोस्ताना'ची चलती
फालतू विनोदांवर लोक चेकाळती
घरच्यांना आहेच चिंता तरुण मुलाची
हर्षीती कळता ओढ याची फॅशन टीव्हीची
चालेल मैत्रीण याची वाणाची ना गुणाची
वर्दळ मात्र घरी नको कुणा मित्राची!
जग बदलले; कायदेही बदलले
चालते विजातीय; शंकास्पद सजातीय
आधी होतं'अय्या पाहिलेस का गो! '
झालंय आता'अय्या पाहिलेस का गे! '
मित्रा सुखी राहा तू तुझ्या घरी
येउ नकोस चुकुनही माझ्या दारी!
तुही समजून घे ह्या जगाची कात्री
नाही चालत रे!....... आजकाल असली मैत्री!