भिजलेले क्षण...............

पावसात भिजताना..... तुझेच रुप स्मरले.....‍जिंकले ते इंद्रधनु.... पुन्हा आभाळ रडले ....... आज पुन्हा पावसाने जुन्या आठवणीना उजाळा दिला. त्यावेळी लिहिलेले ते शब्द आज आठवले आणि मन भुतकाळाच्या उंबरठ्यावर जाउन पोहोचले. तेव्हाचे ते हळवे क्षण आजही बंधिस्त करतात या पावसात. आज परत एकदा या पावसाने हजेरी लावली, आणि डोळ्यासमोर आले महाविद्यालयातले काही भिजलेले दिवस. पुर्वीसारखा पावसात चिंब भिजण्याचा हट्ट टाळावा लागतो मनाला. आजकाल फक्त कार्यालयातील संगणकासमोर संपुर्ण दिवस कसा पुढे सरकतो याचे भान राहत नाही. मात्र कधीतरी महाविद्यालयातील मित्रासोबतची चर्चा उल्लेखणीय ठरते... चर्चेतही पावसाचे अस्तित्व जाणवतेच. तेव्हाच्या कांदाभजीला आजच्या वडापाव ची सर मुळीच राहत नाही. पण चर्चेतले सर्वच मित्रमंडळी मुकेश, तुषार, रजनीश, राज, प्रीती, व्रूषाली पावसात बेधुंद असतात. प्रत्येकाची एक वेगळी ओळख, मात्र कार्यालयातील पाऊस सर्वांचाच लाडका....! एक मेजवानी कडक चहाची..... एक कट्टा काव्यरसिकांचा ......... आणि एक ओंजळ पावसाची...... आणखी काय हवय आयुष्यातला विरंगुळा जपायला.???

-----प्रविण रोहणकर (९३२०१६०७०७)