प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाराष्ट्रमाता जिजाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांना वंदन करण्यासाठी अखिल भारतीय कीर्तन संस्थेत दिनांक २० ऑगस्ट २००९ रोजी मातृदिन साजरा केला जाणार आहे.
ह्या निमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, त्याचे विषय पुढीलप्रमाणेः
1. जाहीरातींच्या विळख्यात दूरदर्शनचे प्रेक्षक
2. आधुनिक काळातील स्त्री संत
3. महिलांच्या कामाचे (गृहकामाचेही) आर्थिक मूल्यमापन
निबंधाचे नियम पुढीलप्रमाणे -
स्वच्छ अक्षरांत फूलस्केप कागदावर (पाठपोठ) लिहावे
कमाल मर्यादा दोन पाने किंवा ५०० शब्द
निबंधासोबत आपले पूर्ण नाव, पत्ता व संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक
निबंध अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या कार्यालयात आणून देण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २००९
अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या कार्यालयात सायंकाळी ५ ते ८ ह्या वेळेत आणून द्यावेत
स्पर्धेत स्त्री वा पुरुष कोणीही सहभागी होऊ शकतात
सहभागी संस्थाः
- ब्राह्मण सहाय्यक संघ। - ब्राह्मण सेवा मंडळ। - नंदादीप समिती। - स्त्री संरक्षक संघ। - राष्ट्र सेविका समिती। - भारतीय भगिनी समाज। - अखिल भारतीय कीर्तन संस्था
अखिल भारतीय कीर्तन संस्था
डी एल वैद्य रोड, दादर, मुंबई - ४०० ०२८
दूरध्वनी क्रः ०२२-२४३२१४७४