स्वप्न आणि सत्य !

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार  भांडण झाले. विषय होता, उत्तम भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा?
ते या प्रश्नाचे उत्तर विचारायला ब्रम्हदेवाकडे गेले. ब्रम्हदेव त्याना म्हणाले, ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही पाय मात्र जमिनीवरच राहतील त्याचाच भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग असेल.

प्रथम स्वप्ना ने प्रयत्न केला, त्याचे हात आभाळाला एक उडीत टेकले पण पाय मात्र जमिनीवरून कधीच सुटले होते.
त्यानंतर सत्याने प्रयत्न केला त्याचे पाय पक्के जमिनीवर राहिले होते पण  हात काही केल्या आभाळाला टेकेनात.

हिरमुसून परत दोघे ब्रम्हदेवाकडे गेले.
यावेळेस ब्रम्हदेव म्हणाले, याचा अर्थ  भविष्य घडविण्यासाठी स्वप्न आणि सत्य दोघांचाही महत्त्वाचा वाटा आहे, खऱ्या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहायला हवे !!

 वरील गोष्ट मला विपत्राने आली होती.