रवा केक

  • रवा- १ वाटी
  • साखर-१ वाटी
  • दही- १/२ वाटी
  • क्रीम-१/२ वाटी
  • दुध- १/२ वाटी
  • बेकिंग सोडा- १ छोटा चमचा
  • वॅनिला इसेंस- १ चमचा
३० मिनिटे
४ जणांसाठी

वरील सर्व साहित्य एकत्र करावे. ओवन प्रथम १०० डिग्री वर २ मी. प्रिहीट करून घ्यावा. नंतर केक च्या भांड्याला थोडेसे तेल लावून ग्रीसिंग करून मिश्रण घालावे व भांडे ओवन मध्ये ठेवावे. १५० ते २०० डिग्री पर्यंत हळुहळू ताप्मान वाढवावे.टुथपिक ने केक तयार झाला का ते  पाहावे. टुथपिक ला केक चे मिश्रण न लागल्यास केक तयार झाला असे समजावे.केक गार झाल्यावर आइसिंग शुगर ने डेझाईन पण काढता येऊ शकते.

माझी आई हा केक गॅस वर एका भांड्यामध्ये वाळू ठेवून त्यावर केक चे भांडे ठेवून करते. त्यामुळे जर ओवन नसेल तर हा केक गॅस वर पण करता येऊ शकतो.