कुलूप

उडत्या विचारांमागे मन राहते धावत,
एकही मात्र तुझ्यापर्यंत नाही पोहचत,

हवी आहे उशी तुझ्या स्पंदनाची,
हवी आहे झुळूक तुझ्या फुंकरेची,

तुला पाहताना उमलतात स्वप्ने,
अशीच कुलुपामागे साचतात स्वप्ने,

बंद दार उघडत नाही जरी चांदण्याचा सोस,
तुझ्या समोर शब्दांचा गाव पडतो ओस.