सत्यनाऱायण

सहज काही विशेष काम नव्हत म्हणून आज मनोगत एखादे मासिक चाळावे तसे चाळत बसलो होतो. त्यावर २००६ मधील सत्यनारायणाची पुजाहा लेख वाचला . मी तसा मनोगतचा बाळसं न धरलेला , अवघे ३-४ मास वय असलेला सभासद त्यामुळे लेखावर काही ह्या अगोदर बोलता आलेनाहि. इथे लेखकाचे नाव मी मुद्दाम टाळत आहे. मध्यंतरीच्या काळात स्व. सावरकरांच्या जगप्रसिद्ध उडीवरपण आक्षेपार्ह लिखाण वाचनात आले.वाचून बरे वाटले. वाटले आपली सामाजिक उन्नती कोणत्या मार्गाने होतेय ह्याचा बोध झाला. सत्यनारायण कथेवरील प्रतिक्रिया वाचल्या. संतोष भरून पावला.
            हया लेखाचे उत्तर तब्ब्ल ३ वर्षांनी देतोय. मी आपल्या सर्वांना उशीरा येऊन मिळालो त्याबद्दल प्रथमतः क्षमस्व! आणि विचार मांडतो.
           धर्म म्हणजे काय? पहिले इकडे वळू . जे जे कार्य सदसद्विवेक बुद्धीला स्मरून केलेले असेल ते सर्व कार्य धर्म. मग तुम्ही म्हणाल की
एखाद्या चोराने चोरी केली तर ती धर्म होऊ शकेल ? हो नक्कीच होऊ शकेल पण ती चोरी त्याने स्वतःच्या उपजीविकेसाठी करायला हवी., जर तसे असेल तर तो धर्म कारण तो चोर चोरीकरतो ती पोटासाठी स्वतःचे घर घोटाळे करून भरणाऱ्यांना धर्म म्हणता येणार नाही. भिकाऱ्याचे पण तसेचपोटापुरते भीक मागून खाणे देखिल लज्जास्पद अथवा अधर्म होऊच शकत नाही.
          आज आपण २१ व्या शतकाकडे वाटचाल केली जाती पातीची बंधन सैल झाली , इतर धर्मांचे तत्त्वज्ञान वाचनांत आले तर आज आम्हालाआमचा धर्म दांभिक आणि खोटा वाटायला लागला?. का म्हणून? . हा प्रश्न आज एका पोथीची चेष्टा झाली, एखाद्या ब्राम्हणाची टिंगल झाली , सावरकरांसारख्या देदीप्यमान भास्कराच्या कार्यावर आक्षेप घेतला म्हणून विचारात नाही., तर आपली सामाजिक वृत्ती बदलत चालली आहे त्याचे वाईट वाटते. सामाजिक दृष्टी जी घारेसारखी असायला हवी जी चांगल्यात चांगले आणि जिवंत असेच बघते आणि ते गोळा करते, कावळ्याच्या नजरेत जशी विष्ठा दिसते तसे काहीसे झाले आहे .
         माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे तो समूहात राहतो. समाजात राहत असताना त्याचे स्वतःचे असे काही उत्तरदायित्व असते,
जसे समाजात शांतता राखणे, एकोपा राखणे, उद्दोगशील व सततत प्रयोगशील राहणे. हे त्याचे सामाजिक दायित्व. तसेच समाजातील प्रत्येक
घटकाला त्याचे उदरनिर्वाहाचे साधन मिळवून देणे हे संपूर्ण समाजाचे दायित्व असते. समाजात जर एखाद्याला खोटे बोलून अथवा चोरून पोट
भरावे लागत असेल तर त्याची लाज समाजाला वाटायला हवी की माझ्या बरोबरीने कोणी चोरी करून पोट भरतोय म्हणजे अस्पृश्यतेसारखंच
हा समाजाच्या ललाटावरचा हा कलंक आहे हे मान्य करावे लागेल. कोणतीही बाई स्वेच्छेने स्वतःचा शिलाचा बाजार मांडत नसते . तिचा हा शिलाचा बाजार कोणत्या समाजाला भूषणावह ठरू शकतो? कोणाच्या घरात हि गोष्ट अभिमाने छातीपुढे काढून सांगितली जाईल बरं?
त्यामुळे ती तीच शिल बाजारात विकते ह्याचाच अर्थ सामाजिक शिल तरी शाबुत आहे का? असे नाही वाटत?
         हे जे काय आपल्या समाजाला दृष्टी लाभलेली आहे तीस फक्त आपला धर्म जवाबदार आहे असे मला वाटते. निशस्ञावर शस्ञ वापरुनये, परस्ञी माते समान जाणावी हे कुठे शिकायला जावे लागत नाही. हे सामाजिक शिक्षण आई, बाप , भाऊ , बहीण , मित्र, शिक्षक
ह्यांच्याकडूनच मिळते ना? आणि हा विशाल दृष्टिकोन आपल्याला आपल्या धर्मानेच शिकवला आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून आणि......
आठवताय ना?
        प्रत्येक धर्माची स्वतःची अशी काही प्रतीके असतात. आणि ती त्या त्या धर्मातील समाजाने जपायचीच असतात. नाहीतर समाज छिन्न विच्छिन्न व्हायला वेळ लागत नाही. पुजा करा असे तुम्हाला कोणीच आग्रहाचे निमंञण देत नसते आणि जरी एखाद्याने ते दिले तर पुजा  करायची की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग असतो. आणि मुळात ईश्वराकडे काही मागण्यासाठी पुजा करतात तेच मुळी चुकीचे .
भगवंता आता पर्यंत जे जे तू मला दिले ते ते सर्व तुझेच होते मी येताना काही आणले नव्हते, पण आज तुझ्या कृपाप्रसादाने आज मी दोन घास सुखाचे घाउन दुसऱ्याच्या मुखातसुद्धा दोन घास घालण्याचे सामर्थ्य दिल्या बद्दल त्याच्या दातृत्व भावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुजा बांधायची असते., मग तो सत्यनारायण असो, खंडोबाचा गोंधळ असो, वा मढ्याची पुजा.
         प्रत्येक माणसाला स्वतःचे चांगले व्हावे, प्रगती व्हावी, धन संचय विपुल प्रमाणात व्हावा, संतती, आरोग्याविषयी शुभकामना चिंतण्याचा जन्मसिद्ध अधिकार असतो. त्याची प्रामाणिक इच्छा तशीच असते. इच्छा प्रदर्शित करणे हे आपले काम पण ती पूर्णं करायची की नाही ते दाता ठरवेल. आणि तुम्ही फुटकळ एखादी अशी पुजा करून त्याला खूश करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे तो काय एखाद्या सरकारी कचेरीतील कारकून वाटला की काय? की जी पूजेची लाच तुम्ही देता?. सत्यनारायण तो अडक्याचा असा कीतीचा ? पण ह्यात ही तुम्ही व्यवहार्य चातुर्यता दाखवता. मोजून १०० रु. खर्च करता आणि सुख दे , शांती दे , धन दे , संपत्ती दे, आयू दे , आरोग्य दे, . अवघ्या १०० रु. आयुष्यभराची बेगमी करायला पाहता. कसे शक्य होईल ? १०० रु देउन आयुष्यभर तुमची जेवणाची बेगमी करणार नाही आणि ज्याची पुजा
बांधून तुम्ही एवढ्या इच्छा प्रदर्शित करता ते पूर्ण करायला त्याला थोडा कालावधी द्याल की नाही? कि लगेच पी हळद आणि हो गोरी अस कुठे
होतय का?
        मुळात पुजा कशासाठी करायची त्याची माहिती पुरोहित वर्गाकडे मागा. त्याची फलश्रुती समजवून घ्या. जास्तीत जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न करा. कार्य करा , पुजा बांधा पण चौकस व्हा. आज पर्यंत त्यांनी सांगितले नि आपण केले. संध्याकाळी घरी आल्यावर
विचारले काय हो कसली पुजा आज? काय केल पुजेत ? तर त्याची उत्तर तुम्हाला देता आलीच पाहिजे शेवटी पैसे मोजताय ना?