पाहुन मेघ अंबरी

पाहुन मेघ अंबरी
मनी मोर पिसारा फ़ुलला होता
तुझ्या आठवणींच्या श्रावण सरित
उगाच तो गंधीत होता.

नव्हते शब्दांचे बंधन
ना सुरात मी वेढला होता
मुक्त छंदात गुंतुनी
स्वतातच मी हरवला होता.

श्रावणही तेंव्हा
सोबतीस माझ्या होता
गाता गाता मारवा
गीत वसंतात मी धुंद होता

रुणझुण तुझ्या पैंजणाची
शब्दात मी गुंफ़त होता
गतजन्मीच्या आसंवात
तेंव्हा धुंद धुंद भिजला होता