आकाशात गर्द मेघांचे काजळ
सोबतीला फ़क्त
तु आणि मीच
माझे पाय घराकडे
तु मात्र
स्वतातच हरवलेली
वार्यासोबत हसणारी
गाली थेंब झेलणारी
निसर्ग हि आज
तुझ्यासारखाच बेधुंद होता
कधी खट्याळ वारा बनुनी
तुझ्या रेशमी कुंतलात झुलत होता
तर कधी
लखलखणारी विज बनुनी
ह्रुदयात तुझ्या
स्पंदित होता
तुझ्या पावलांच्या स्पर्शाने
मातिचा कण आणि कण
सुगंधीत होत होता
वेड जग मात्र समजी
मातीचा हा गंध ओला
आणि अशातच तुझ
माझ्या नजरेत नजर
भरुन पाहण
एक वेडी कामना
मनात घर करुन जाते
अन बेभान वदळ ते
दोघंमधील अंतर मिटवू पाहते
तुझा गार हात
हातत तेव्हां घेतांना
तुझ्या तनामनातिल स्पंद
नकळत मी अनुभवत होतो
आणि त्या दिवसानंतरच्या
कित्तेक रात्री
त्या स्पंदनातच भिजलो होतो