रवा मिक्स व्हेज उत्तपा

  • बारिक रवा २ वाट्या, अर्धी वाटी तांदूळाचे पीठ.
  • चिरलेला कोबी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. ( सगळे मिळून १ वाटी )
  • किसलेले गाजर, बीट आणि मोड आलेले मूग. ( सगळे मिळून १ वाटी )
  • मिरचीचे अगदी बारिक तुकडे / ठेचा, मीठ. ( चवीनुसार )
२० मिनिटे
४ जणांना एकदा जेवणाला पुरेल.

१) रवा ५-६ तास पाण्यात (सरसरीत) भिजवावा.

२) नंतर त्यात तांदूळाचे पीठ, मीठ, मिरचीचे अगदी बारिक तुकडे / ठेचा आणि बाकी सर्व साहीत्य घालवे.

३) निर्लेप तव्यावर तेल टाकून , नेहमी प्रमाणे उत्तपे घालवेत. (दोन्हीकडून भाजावेत.)

रंगीबेरंगी आणि पौष्टीक उत्तपे तयार !

( हे सॉस किंवा पंढरपूरी डाळं, मिरच्या, ओलं खोबंर, कोथिंबीरी च्या चटंणी बरोबर खावेत. )

नाही.

सौ. आई